‘या’ खास कारणामुळे ऐश्‍वर्याने नाकारला “कुछ कुछ होता है’ चित्रपट

बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी विश्‍वसुंदरी ऐश्‍वर्या रायने आपल्या दमदार अभिनयातून जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ऐश्‍वर्याने आपल्या करियरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. यातील काही चित्रपट सुपरहिट ठरले, तर काही चित्रपटांना बॉक्‍स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

ऐश्‍वर्याने किंग खान अर्थात शाहरुख खानसोबत अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. परंतु आपणास माहीत आहे का, ऐश्‍वर्याने शाहरुखच्या सुपरहिट “कुछ कुछ होता है’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत स्वतः ऐश्‍वर्याने याबाबत खुलासा केला होता.

1998मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या “कुछ कुछ होता है’ या रोमांटिक कॉमेडी चित्रपटाने जबरदस्त गल्ला कमविला होता. यात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या ब्लॉकबस्टर चित्रपटातील कथेसह गाणी आणि डॉयलॉग आजही प्रसिद्ध आहेत. या चित्रपटात टीनाची भूमिका साकारत राणी मुखर्जी रातोरात स्टार बनली होती.

करण जोहरने या भूमिकेसाठी ट्‌विंकल खन्ना, करिश्‍मा कपूर, रवीना टंडन आणि ऐश्‍वर्या राय यांना ऑफर दिली होती. परंतु ही भूमिका करण्यास त्यांनी नकार दर्शविला होता. यासंदर्भात एका मुलाखतीत एश्‍वर्या म्हणाली, त्यावेळी मी चित्रपटसृष्टीत नवीन होती.

परंतु माझी तुलना आघाडीच्या अभिनेत्रींशी करण्यात येत होती. मी ही भूमिका साकारली असता मला असे म्हटले गेले असते की, ऐश्‍वर्या रायत तेच करत आहे, जे ती मॉडलिंगच्या दिवसांमध्ये करत होती. यामुळे मी हा चित्रपट नाकारल्याचे ऐश्‍वर्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.