औंध -राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते आदरणीय अजित पवार हे त्यांच्या जलद कार्यशैलीसाठी ओळखले जातात, त्यांच्या नेतृत्वात काम करताना आपल्यालाही संघटना बांधणीसाठी वेगवान प्रयत्न करावे लागणार आहेत. युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांचेही काम वेगवान आहे, अतिशय तातडीने नियुक्त्या करून युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी आपल्या कामाचा वेग सिद्ध केला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी चांदेरे यांच्या कामाचे कौतूक केले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पुणे शहर कार्यकारिणीसाठी युवा सहकाऱ्यांच्या पदनियुक्त्या शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनोज बालवडकर व अच्युत लांडगे यांची युवक शहर कार्याध्यक्षपदी, राखी श्रीराव यांची महिला शहर उपाध्यक्षपदी व सुषमा ताम्हाणे यांची महिला शहर सरचिटणीसपदी तसेच आरती शेळके यांची कोथरूड विधानसभा युवती उपाध्यक्षपदी आणि वैशाली तापकीर यांची प्रभाग क्र. 9 युवती अध्यक्षपदी, युवक सहकारी प्रशांत कडू यांची वरीष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिपक मानकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. गुप्ते लॉन्स येथे झालेल्या या समारंभास दत्ता सागरे, मनोज पाचपुते, हरिष लडकत, महेश हांडे, अभिषेक बोके तसेच अनेक युवक सहकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.