पुणे -आयस्क्वॉश अकादमी तर्फे सीएसके आयस्क्वॉश करंडक खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेच्या 11 वर्षाखालील गटात विश्रूत अरोरा, मिखेल मेहता, प्रभास कोंडापर्थी तर, 13 वर्षाखालील गटात आदित्य शहा आणि मुदीत शहा या खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
या स्पर्धेच्या 11 वर्षाखालील गटात विश्रूत अरोरा याने सांश मल्होत्रा याचा 14-12, 8-11, 11-8, 11-6 असा पराभव केला. मिखेल मेहता याने विहान रे याचा 6-11, 11-9, 11-7, 11-6 असा पराभव केला. प्रभास कोंडापर्थी याने अव्देत ओस्वालवर 11-1, 11-2, 8-11, 11-3 असा विजय मिळवला. आरव कोथापल्ली याने सिरहान सिंघी याचा 11-4, 11-3, 11-2 असा पराभव करून आगेकूच केली. 13 वर्षाखालील गटामध्ये आदित्य शहा याने विनय शिंदे याच्यावर 8-11, 11-6, 11-9, 11-9 असा विजय मिळवला.
पाच गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुदीत शहा याने सिध्दांत राजपुत याच्यावर 12-10, 8-11, 11-8, 8-11, 12-10 असा विजय मिळवला. स्पर्धेचे उद्धघाटन आयस्क्वॉश अकादमीचे संचालक मरीषा जिल्का आणि असिफ सय्यद आणि सहसंचालक रोहीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.