मुंबई – “महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत’, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून राज्यभर पडसाद उमटत आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी भिडे गुरुजींच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात येत आहेत. अश्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
“महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्या अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही..’ असं स्पष्ट फडणवीस यावेळी म्हणाले.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करु नये.
महात्मा गांधी असाेत की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन होणार नाहीत. या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल. तसेच, संभाजी भिडे यांचा भाजपशी काहीही संबंध नाही. असं देखील यावेळी ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, “जसं काँग्रेस आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत त्याचप्रमाणे जेव्हा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तेव्हा त्यांनी आंदोलन करायला हवं होतं, असेही फडणवीस म्हणाले. महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर कोणाहीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन केलं जाणार नाही.’ असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.