लखनौ – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचेही विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यूपी विधानसभा सचिवालयाने अब्दुल्ला आझम यांची जागा रिक्त घोषित केली आहे.
मुरादाबाद येथील विशेष न्यायालयाने सोमवारी “सपा’चे सरचिटणीस आझम खान आणि त्यांचा आमदार मुलगा अब्दुल्ला आझम यांना 15 वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोघांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड देखील ठोठाविण्यात आला आहे.
अब्दुल्ला आझम खान रामपूरच्या सुआर मतदारसंघातून आमदार होते. मात्र, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेच्या तारखेपासून अपात्र ठरवले जाते. तसेच, तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतरही सहा वर्षे अपात्रता कायम राहते.
Supreme Court : जया ठाकूर यांच्या अदानी प्रकरणाच्या याचिकेवरही 17 तारखेला होणार सुनावणी
आझम खान यांचे ऑक्टोबर 2022 मध्ये विधानसभेचे सदस्यत्व रद्द ठरविण्यात आले होते. त्यानंतर आता खान यांचा मुलगा अब्दुल्ला खानचे विधानसभेचे सदसत्त्व रद्द करण्यात आले आहे.