वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली ता. हवेली येथील गणेशनगर मधील ब्लिथ आयकॉन सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रेरणा जामकर यांनी ससून हॉस्पिटलमध्ये कोविंड 19 या विभागात 25 दिवस काम करून त्या घरी आल्या. त्यानंतर सोसायटीमधील सर्व नागरिकांनी टाळ्या, थाळी, घंटी वाजवून, त्यांचे स्वागत केले.
वाघोली मधील प्रेरणा जामकर यांनी कोविड 19 या विभागात बजावलेले कर्तव्य कौतुकास्पद असल्याचे माजी उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले.