“चिकन मसाला और कोल्ड लस्सी’या सिनेमासह काही टीव्ही सिरीयलमधून प्रसिद्धी मिळवलेली सलोनी खन्ना आता लवकरच वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तिचे लीड रोल असलेले “ब्रोकन बट ब्युटिफुल 3′ आणि “सनफ्लॉवर’ या वेबसिरीज एका आठवड्याच्या अंतराने रिलीज होणार आहेत.
“ब्रोकन बट ब्युटिफुल 3′ 29 मे रोजी आणि “सनफ्लॉवर’ 11 जून रोजी रिलीज होणार आहे. सलोनी खन्नाने 5 मे रोजी विराफ पटेलबरोबर कोर्ट मॅरेज केले आहे. फक्त 150 रुपयांत झालेल्या या लग्नाची खूपच चर्चा झाली.
या लग्नात बडेजाव टाळून या दोघांनी वाचवलेले पैसे कोविडच्या मदतकार्यासाठी देणगी म्हणून देण्याचे ठरवले आहे. कोविड रुग्णांना आणि गरजवंतांना या निधीतून मदत केली जाणार आहे. पण त्याबाबतचा तपशील अद्याप ठरवला गेलेला नाही.
पुढच्या आठवड्यात हा तपशील ठरवला जाईल, असे सलोनी म्हणाली. लग्नासाठी म्हणून अगोदर साठवून ठेवलेल्या पैशांपैकी 50 टक्के पैसे देणगी देण्याचे या दोघांनी ठरवले आहे. मात्र एकूण किती पैसे ते देणगी देणार आहेत, हे काही तिने सांगितले नाही.