हुमा कुरेशी हॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. “आर्मी ऑफ डेड’ या तिच्या पहिल्या हॉलीवूडपटाच्या सेटवरील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील हॉटेलच्या रुममधील अस्ताव्यस्त पडलेल्या पसाऱ्याचाही फोटो तिने शेअर केला आहे. या रूममध्ये एका कोपऱ्यातल्या सोफ्यावर हुमा ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक डेनिम पॅन्टमध्ये बसलेली दिसते आहे.
या रूममध्ये झोंबीने थैमान घातलेले असल्याचे लगेच लक्षात येते आहे. या हॉटेलच्या रूमच्या बाहेर झोंबी आलेले आहेत, असेही तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. झोंबी अर्थात भूतांनी झपाटलेल्या व्यक्तींचा वावर असलेल्या घरातील थरारनाट्य आपल्याला “आर्मी ऑफ डेड’मध्ये बघायला मिळणार आहेत.
हा थरारपट सध्या अमेरिकेत रिलीज झाला आहे. तर भारतात नेटफ्लिक्सवर 21 मे रोजी “आर्मी ऑफ डेड’ रिलीज होणार आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हुमा कुरेशीने “आर्मी ऑफ डेड’मधील लुक रिलीज केला होता. “जॉली एलएलबी 2′, “बदलापूर’ आणि “गॅंग्ज ऑफ वासेपूर’नंतर तिच्या वाट्याला तसाच भन्नाट सिनेमा आला आहे.