Sunny Deol: अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटानंतर त्याची पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर त्याला अनेक सिनेमांसाठी ऑफर आल्या आहेत. त्याने पुन्हा एकदा नव्या चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता सनी देओलच्या आगामी चित्रपटात बॉलीवूडचा दबंग अर्थात सलमान खान कॅमिओ करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या सनी देओल त्याचा आगामी ‘सफर’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमान खान जानेवारीमध्ये या चित्रपटासाठी कॅमिओ शूट करणार आहे. सलमान फक्त एक दिवस शूट करणार असून यात तो सुपरस्टार सलमान खानच्याच भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, सलमान आणि सनी देओल चांगले मित्र आहेत. एकीकडे सलमान खानने सनीचा मुलगा करण देओलच्या लग्नाला हजेरी लावली होती, तर दुसरीकडे त्याने गदर-2चे कौतुकही केले होते. याआधीही दोघांनी ‘जीत’मध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती.
सलमान खान आणि सनी देओलला एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी त्यांचं चाहते उत्सुक आहेत. या दोन्ही स्टार्सचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सफर’ या चित्रपटाची निर्मिती विशाल राणा करत आहेत. 2024 च्या अखेरीस हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर सनी देओल ‘लाहोर: 1947’ च्या शूटिंगला सुरुवात करू शकतो. याशिवाय 2024 च्या अखेरीस सनी देओल बॉर्डर या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलवरही काम सुरू करणार आहे.