मुंबई – बॉलीवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खानचा बाहुप्रतीक्षित दबंग ३ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चलबुल पांडेची नेहमीची करामत, मस्ती, फाईटिंग याही चित्रपटात पहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून तरी हा चित्रपट प्रेक्षकांचे नेहमीप्रमाणे भरपूर मनोरंजन करेल यात शंका नाही.
Action, entertainment aur comedy ka laajawaab mixture sirf Dabangg 3 trailer ke saath #Dabangg3Trailerhttps://t.co/nmTyx7SktX@BeingSalmanKhan @arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @saffronbrdmedia
— Salman Khan Films (@SKFilmsOfficial) October 23, 2019
रज्जोच्या भूमिकेतील सोनाक्षी सिन्हा आणि नवोदित अभिनेत्री सई मांजरेकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची बातमी ट्विट करुन दिली आहे. प्रभू देवा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या २० डिसेंबरला दबंग ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.