सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी

सचिन दोडके यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे – खडकवासला मतदारसंघात महायुती आणि आघाडीमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये 3 ईव्हीएम बंद पडल्या तर, दोन मशीनच्या मतमोजणीबाबत तफावत आढळून आली. त्यामुळे सचिन दोडके यांनी सुरवातीला या पाचही मशीनची व्हीव्हीपॅट तपासणी करण्यात आली. मात्र, शेवटच्या क्षणी दोडके यांचा विजय केवळ 2 हजार 595 मतांनी निसटत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सर्व व्हीव्हीपॅटची तपासणी करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांच्याकडे केली.

मतमोजणीच्यावेळी मशीन क्रमांक 53, 166, 176, 182 आणि 215 या 5 मशीनची तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणी होऊ शकली नाही. त्यामुळे 23 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर या 5 मशीनची व्हीव्हीपॅट तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 2 हजार 300 मते होती. मात्र, भीमराव तापकीर यांना अडीच हजाराच्या मताधिक्‍य होते. त्यामुळे शेवटच्या क्षणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यामध्ये दोन मशीनमध्ये केंद्रचालकाकडून आकडे लिहिताना चूक झाली होती. मात्र, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची मते एकसारखी आली. त्यानंतर तीन मशीनच्या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. दरम्यान, यावेळी सचिन दोडके यांनी अनेक अर्ज देत, फेर मतमोजणीची विनंती केली.

“वंचित’मुळे राष्ट्रवादीला फटका?
खडकवासला मतदारसंघात आघाडीचे सचिन दोडके यांना 1 लाख 17 हजार 923 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे आप्पा आखाडे यांना 5 हजार 923 मते घेतली. मात्र, ही मते राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नसते तर दोडके यांना विजयापर्यंत सहज पोहोचता आले असते. त्यामुळे दोडके यांना त्याचा चांगलाच फटका बसला.

Leave A Reply

Your email address will not be published.