सलमान खानचे लग्न झाले….?

मुंबई – बॉलीवूडमधील सुपरस्टार आणि अजूनही अविवाहित असलेल्या सलमान खानचे समीकरण आतापर्यंत अनेक हिरॉईनबरोबर जोडले गेले आहे. मात्र अजूनही तो कोणाशी लग्न करणार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याचे लग्न झालेले आहे आणि त्याची पत्नी आणि मुलगी दुबईमध्ये रहात असल्याची अफवा पसरली आहे. स्वतः सलमान खानने या अफवेचे खंडन केले आहे.

सलमानचा भाऊ अरबाझ खानच्या एका चॅट शो मध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता. सलमानच्या एका चाहत्याने यासंदर्भातील दावा केला होता. सलमानचे लग्न झाले आहे. त्याच्या पत्नीचे नाव नूर आहे. त्याला 17 वर्षांची एक मुलगी देखील आहे, असे ट्‌विट या चाहत्याने केले आहे.

सलमानने हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. “या लोकांना हे सर्व माहित असते. यांच्या दाव्याचे खंडन मी करावे, अशी यांची अपेक्षा आहे का ? माझे लग्न झालेले नाही. मी भारतातच राहतो. गॅलक्‍सी अपार्टमेंटमध्ये मी राहतो. माझ्या घरावरच माझे वडील राहतात. हे सगळ्यांना माहिती आहे.’ असे सलमान म्हणाला.

आता त्याच्या विवाहाबाबतची चर्चा थांबेल अशी किमान त्याची अपेक्षा असावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.