चीनमध्ये अतिवेगवान रेल्वेचे उद्‌घाटन; वेग वाचून व्हाल थक्क…

बीजिंग – चीनमध्ये मंगळवारी अतिवेगवान रेल्वेचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. मॅग्लेव असे या नवीन रेल्वेचे नाव आहे आणि तिचा वेग ताशी 600 किलोमीटर इतका प्रचंड आहे. ही पृथ्वीवरील आतापर्यंतची सर्वात वेगवान रेल्वे आहे, असा दावा चीनच्यावतीने करण्यात आला आहे. चीनच्या पूर्वेकडील शेंगदोंग प्रांतातील क्‍विंगदो या किनारपट्टीच्या शहरात या रेल्वेचा प्रारंभ करण्यात आला. शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

मॅग्लेव या अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाला 2016 च्या ऑक्‍टोबरमध्ये सुरुवात करण्यात आली होती. या रेल्वेच्या अतिवेगवान प्रवासासाठी मॅग्नेटिक लेव्हिएशन प्रणाली वापरण्यात आली आहे. 2019 मध्ये या रेल्वेने तोशी 60 किमीचा वेग गाठल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची चाचणी 2020 च्या जून महिन्यात घेण्यात आली होती.

मॅग्लेव रेल्वेचा मार्ग नेहमीच्या रेल्वेप्रमाणे अन्य कोणत्याही मार्गाशी संपर्क येणार नाही. याचा फायदा या रेल्वेचा वेग वाढण्याससाठी होणार आहे. तसेच या रेल्वेचा अजिबात आवाज येणार नाही. ही रेल्वे आपला सर्वाधिक वेग पटकन गाठू शकते. तसेच ह रेल्वे पटकन थांबूही शकते. 

या रेल्वेला 2 ते 10 डबे असतील. यातीवल प्रत्येक डब्यामध्ये 100 प्रवासी असणार आहेत, असे या प्रकल्पाचे मुख्य इंजिनिअर डिंग सॅन्सान यांनी सांगितले. 1,500 किलोमीटरचा प्रवास करायचा असल्यास या रेल्वेने प्रवास करणे अधिक योग्य असणार आहे. विमान प्रवास आणि हायस्पीड रेल्वेच्या प्रववासातील वेळेची तफावत ही अतिवेगवान रेल्वे भरून काढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.