मुंबई – अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘टायगर 3’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या दोन भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता चाहते या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता ‘टायगर 3’ चित्रपटाबाबत निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठी अपडेट दिली आहे.
सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही सांगितली आहे. सलमानने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत ट्वीट केले की, ” आ रहा हूं! दिवाळी 2023 ला येतोय टायगर 3. यंदाची दिवाळी YRF50 सह टायगर 3 मोठ्या स्क्रीनवर साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज.” तर कतरिनाने देखील सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिले की, “मर्यादा नाही, भीती नाही, मागे वळून बघायचं नाही.या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये #Tiger3. “या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना दोघांच्या हातात बंदूक असून दोघेही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
Aa raha hoon! #Tiger3 on Diwali 2023. Celebrate #Tiger3 with #YRF50 only at a big screen near you. Releasing in Hindi, Tamil and Telugu. #KatrinaKaif | #ManeeshSharma | @yrf pic.twitter.com/3bMBWyPVGm
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 2, 2023
दरम्यान, टायगर 3 हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’ फ्रँचायझीमधला हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले होते. या फ्रँचायझीमध्ये सलमान भारतीय गुप्तहेर अविनाश सिंग ‘टायगर’ राठौरच्या भूमिकेत आहे आणि कतरिना पाकिस्तानी गुप्तहेर झोया हुमैमी आहे. भाईजानच्या चाहत्यांना खात्री आहे की ‘टायगर 3’ बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडेल. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.