मुंबई – सैराटप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा मराठी चित्रपट ‘मुळशी पॅर्टन’ लवकरच हिंदीत येणार आहे. 2018 साली दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
दरम्यान, मुळशी पॅर्टनच्या हिंदी रिमेक मध्ये ‘आयुष शर्मा’ गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता ‘सलमान खान’ एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक होणार असल्याचं समजल्यानंतर प्रविण तरडे खुश झाले आहेत. सई मांजरेकर देखील आयुष शर्मा सोबत या चित्रपटात झळकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.