अदिती फक्त एक अभिनेत्री नाही तर एक सायकोलॉजिस्ट सुद्धा आहे आणि तिने अनेक बॉलीवूड सेलेब्रिजना डिप्रेशनसारख्या मानसिक आजारातून बाहेर पडण्यास मदत केली आहे. तसंच तिने आत्तापर्यंत दे दना दन, पहेली, भेजा फ्राय आणि मराठी चित्रपट “स्माईल प्लिज” मध्ये विविध भूमिका केल्या आहेत. आता तिला संधी मिळाली आहे ती श्रीदेवीच्या गाण्यात दिसण्याची.
अदिती गोवित्रीकरच्या आगामी ‘कोई जाने ना’ या कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर स्टारर चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याच चित्रपटात श्रीदेवीचं गाणं दिसणार आहे. या गाण्याबद्दल अदितीने सांगितलं की,चित्रपटाची सुरूवात माझ्यावर चित्रित केलेल्या मिस्टर इंडियातील “जिंदगी की यही रीत है” या गाण्यापासून होते. या चित्रपटात अदिती दोन सुंदर मुलांच्या आईची भूमिका करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमीन हाजी हे करत असून त्यांची आणि माझी मैत्री खूप आधीपासून आहे आणि त्यांच्यासोबत एका चित्रपटात काम करण्याचे अनुभव खूप छान होता”.
एवढंच नाहीतर ‘कोई जाने ना’ या चित्रपटाव्यतिरिक्त अभिनेत्री अदिती गोवित्रीकर किकू शारदा आणि हितेन तेजवानी सोबतच्या ग्रे स्टोरीज” या वेबफिल्ममध्येही दिसणार आहे.