बॉलिवुडमधील भाईजान अर्थात सलमान खान याच्या आगामी “दबंग-3′ चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. सलमानही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यातच चित्रपटातील “मुन्ना बदनाम’ हे गाणे खूपच लोकप्रिय होत असून अनेक ठिकाणी सलमान खान आपल्या टीमसह या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यातच सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात सलमान खान चक्क प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत डान्स करताना दिसत आहे.
सलमान खानचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खुपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत “मुन्ना बदनाम’ या गाण्यावर सलमान खानसोबत फोटोग्राफर्स आणि मीडिया रिपोर्टर्स ठेका धरताना झळकत आहे. या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी शेअर केले असून त्यावर लाखोंच्या संख्येने कॉमेंटस् येत आहेत.
दरम्यान, दंबग सिरीजमधील हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वीचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या आठवडयात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खान “राधे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.