संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित “इंशाअल्लाह’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. हा चित्रपट 2020 मध्ये ईदला प्रदर्शित होणार होता. मात्र, अभिनेता सलमान खानने हा चित्रपट आता ईदला प्रदर्शित होणार नाही अशी अधिकृत घोषणा केली आहे.
सलमान खानचा चित्रपट आणि ईद हे समीकरण वर्षांनुवर्षे ठरलेले आहे. पण यावेळी सलमानने त्याच्या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. “इंशाअल्लाह’ च्या निमित्ताने सलमान आणि संजय लीला भन्साळी बऱ्याच कालावधीनंतर एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात सलमानसोबत आलिया भट्टही प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. आलिया आणि सलमान हे दोघेही पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करत आहेत त्यामुळे ही जोडी पडद्यावर कशी दिसेन हे पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत.
15 ऑगस्टनंतर ‘इंशाअल्लाह’चे चित्रीकरण सुरू होणार होते. मात्र, त्याच्याचित्रिकरणाला थोडा उशिर झाला आहे. चित्रपटातील काही भाग हा मुंबईत चित्रीत करण्यात येणार आहे. त्यानंतर ऋषीकेश, वाराणसी, हरिद्वार आणि अमेरिकेत चित्रीकरण होणार आहे. मात्र अद्यापही या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झालेली नाही. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होईन अशी घोषणा पूर्वीच झाली होती, मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असली तरी ईदच्या दिवशी मी प्रेक्षकांच्या भेटीला नक्की येणार असेही सलमान म्हणाला आहे.