पुणे – पुण्यातील प्रसिद्ध निर्माते-उद्योगपती आणि पुनीत बालन ग्रुपचे मालक पुनीत बालन हे त्यांच्या निस्वार्थी समाजसेवेसाठी नेहमीच लोकप्रिय राहिले आहेत. गरजूंना मदत करण्यासाठी आणि आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या जागरूकपणे पार पाडण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. अलीकडेच, इको सेंटर, तळा येथे आयोजित एका कार्यक्रमात पुनीत बालन यांनी 4 जून 2022 रोजी आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्त बांधवगड टायगर रिझर्वला (बांधवगड व्याघ्र प्रकल्प) 20 लीफ ब्लोअर मशीन्स दान केल्या.
लीफ ब्लोअर मशीन जंगलं आणि निसर्गाचे संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जंगलात कधी आग लागली असेल तर आग विझवण्यासाठी लीफ ब्लोअर मशीन वापरले जाते. बांधवगड टायगर रिझर्वला या गोष्टी दान करताना पुनीत बालन यांनी तळा येथील इंटरप्रिटेशन सेंटरच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले असून बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला दोन महिंद्रा थार देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
मध्य प्रदेशचे वन मंत्री कुंवर विजय शाह यांनी पुनीत बालन यांचे निःस्वार्थ देणगी आणि मदतीबद्दल आभार मानले. पुनीत बालन आणि त्यांच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त या कार्यक्रमाला क्षेत्र संचालक बी. एस. अन्नेगिरी आणि बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक लोवित भारती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता करताना क्षेत्र संचालक व उपसंचालक यांनी पुनीत बालन व त्यांच्या मित्रांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.
पुनीत बालन हे केवळ एक यशस्वी व्यावसायिकच नाहीत तर एक जागरूक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी आणि त्याच्या प्रतिष्ठानाने (फाउंडेशन) आजवर बऱ्याच लोकांना मदत केली आहे. काश्मीरमध्येही सैन्याच्या संयुक्त विद्यमाने तिथल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास ते सदैव तत्पर असतात. त्यांच्या अशा नि:स्वार्थी आणि मदत करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना ओळखणाऱ्या लोकांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. यावेळीही त्यांनी बांधवगड व्याघ्र प्रकल्पासाठी केलेल्या कामाने समाजासमोर निःस्वार्थ सेवेचा आदर्श ठेवला आहे.