साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरलं

कोलंबो – एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये आज साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली आहे. आज जगभरामध्ये ईस्टर संडे साजरा केला जात असून श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये देखील ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच ३ चर्च व प्रवाशांची वर्दळ असलेल्या ३ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे असल्याचे वृत्त आहे.

श्रीलंकन मीडियाने या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये २५हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावलेे असल्याची प्राथमिक माहिती दिली असून २००हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याने या बॉम्बस्फोटांमागे नक्की कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.