#IPL2019 : दिल्ली कॅपिटल्सची पंजाबवर 5 विकेटस्‌ने मात

नवी दिल्ली – सलामीवीर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 5 विकेटस्‌ने मात केली. पंजाबने दिलेले 164 धावांचे आव्हान दिल्लीने 19.4 षटकांत 5 बाद 166 धावा करत विजय मिळविला.

164 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ 13 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागिदारी करत संघाला विजयासमीप नेले. शिखर धवनला हार्डस विल्युनख याने अश्‍विनकरवी झेलबाद केले. धवनने 41 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार खेचत 56 धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर याने नाबाद 58 धावा करत विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या पंजाबची सुरुवात निराशाजनक ठरली. सलामीवीर केएल राहुल (9) याला संदिप लामिचाने याने दुसऱ्याच षटकांत पंतकरवी झेलबाद केले. त्यानंतर मयंक अग्रवालही 2 धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या डेव्हिड मिलरचा अडसर पटेलने दूर केला.

दुसरीकडे ख्रिस गेल याने त्याच्या धडाका कायम राखत 25 चेंडूतच अर्धशतक झळकाविले. पण संदिप लामिचानेच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. गेलने 37 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार खेचत 69 धावांची खेळी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.