#सैराट: आर्चीची जिवलग मैत्रीण ‘अनि’ खऱ्या आयुष्यात दिसते अशी

सैराट चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं

पुणे – २९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच घर केले असून, त्यांच्या अभिनयाचे सुद्धा तितकेच कौतुक झाले आहे.

आतापर्यंत बहुतेकांनी चित्रपटातील मुख्य कलाकार परश्या आणि आर्ची यांच्या बद्दलबरंच काही ऐकलं व वाचलंही असेल. याच सैराट मध्ये आर्चीची एक जिवलग मैत्रीण ‘अनि’ सुद्धा दाखवली होती. आज या अनि विषयी आम्ही थोडंसं सांगणार आहोत.

चित्रपटातील अनिचं खऱ्या आयुष्यातील नाव “अनुजा मुळे’ आहे. ती राहणारी पुण्याची. तिचं शिक्षण देखील पुण्यातच झालं आहे. दरम्यान, जेव्हा सैराट प्रदर्शित झाला तेव्हा अनुजा पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

अनुजाला आधीपासूनच अभिनय आणि कलाक्षेत्राची आवड होती. महाविद्यालयातील पुरुषोत्तम करंडक या मनाच्या स्पर्धेत तिला आणि तिच्या कलाकारांच्या ग्रुपला पारितोषिक मिळालं. एकांकिका स्पर्धांसोबतच, अनुजाने एका प्रसिद्ध वृत्तपत्राने आयोजित केलेल्या नाट्य स्पर्धेत सुद्धा भाग घेतला होता. असं म्हणतात कि तिथून तिला नागराज मंजुळे यांनी सैराट साठी निवडलं.

आपल्या सर्वांच्या माहितीनुसार नागराज हे कलाकार निवडीबाबत अजिबात हयगय करत नाहीत. आपलं संपूर्ण बालपण शहरात गेल्याने गावाकडची भूमिका थोडी कठीण जाऊ शकली असती. पण अनुजाने तसं कधी जाणवू दिलं नाही, हे तिच्या अभिनयाचं कसब म्हणायला पाहिजे.

अनुजा जशी अभिनय आवडीने करते तसचं तिचं स्वतःच्या अभ्यासाकडेही अधिक लक्ष आहे. त्यामुळे, अभिनय करता करता अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून अनुजाने सैराट नंतर नवीन चित्रपट घेणं टाळलं. तिच्यासारखंच सैराटचे इतर कलाकारही आपापला वेळ आपलं शिक्षण पूर्ण करण्यात घालवताना दिसतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.