sai tamhankar bold look : सई ताम्हणकरचं नवं फोटोशूट व्हायरल, तुम्ही पाहिला का तिचा बोल्ड लुक?

मुंबई  – मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिची ओळखल आहे.

विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सई फारच ग्लॅमरस दिसत आहे. सईच्या या लूकवर चाहते घायाळ होत आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सई व्हाईट कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे. सईचा हा अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच काहीतरी वेगळं आणि हटके करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक हटके अंदाजाला भरभरून प्रतिसाद देत असतात. तिचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसंतदेखील केल्या जातात. सईने मराठी सोबतच हिंदीमध्येही पाऊल ठेवलं आहे.

नुकताच ती “मिमी’ या चित्रपटामध्ये झळकली होती. यामध्ये मुख्य अभिनेत्रींच्या रूपात क्रिती सेनन होती. सईने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका अगदी उत्तम साकारली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.