मुंबई : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठा झटका बसला आहे. कारण दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांना ताब्यात घेतलं असून ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
#Dapoli #SaiResort Scam #SadanandKadam Arrested (Anil Parab’s Partner)
ab
Kya Hoga Tera #anilparab @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 10, 2023
सदानंद कदम यांना घेऊन ईडी मुंबईकडे रवाना झाली आहे. दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेनंतर रामदास कदम यांची नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.
या कारवाईनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचे नसून रामदास कदम यांचा भाऊ सदानंद कदम यांचे असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.