बॉलीवूडमध्ये साहिल खानने 2001 मध्ये एन. चंद्रा यांच्या “स्टाइल’ चित्रपटातून डेब्यू केले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता साहिलने देखील बॉलीवूडबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. साहिलने इंस्टाग्रामवर एका प्रसिद्ध मॅगझिनचा फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कव्हर पेजवर सलमान खान आणि शाहरुख खानसोबत तो दिसत आहे.
यासोबत साहिलने आपल्यासोबत घडलेल्या एका गोष्टीचा उल्लेख करत लिहिले की, असे खूप कमी लोकांसोबत असे जीवनात घडते, जे आपल्या पहिल्या “स्टाइल’नंतर भारतातील सर्वात टॉप फिल्म मॅगझिनच्या कव्हर पेजवर बॉलीवूडमधील दोन सुपर स्टारसोबत झळकतो. पण यातील एका सुपर स्टारला वाईट वाटले. जे की मी नवीन होतो, त्यांचा चाहता होतो आणि थोडा कमकुवत होतो. तरी देखील ते मला अनेकवेळा साइड रोलसाठी बोलवत होते. तसेच टीव्ही शोसाठीही कॉल करत राहिले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमधून मला काढण्यात आले. “नाव मोठे आणि दर्शन छोटे’, अंदाज लावा कोण?
साहिल म्हणाला की, आता मला काहीही फरक पडत नाही. कारण सुशांतसिंह राजपूतने त्याचा खरा चेहरा दाखविला आहे. जगभरातील “ते’ लोक न्यू टॅलेन्ट्सपासून किती घाबरले आहेत – 20 वर्षांत जॉन अब्राहमशिवाय कोणीही इंडस्ट्रीमध्ये मोठा स्टार म्हणून आला नाही. कारण कोणी येवूनच देत नाही. फक्त स्टार किड्सलाच काम दिले जाते. आरआयपी सुशांतसिंह राजपूत.