नवी दिल्ली – क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख आहे अशा मास्टर ब्लास्टर भारतरत्न ‘सचिन तेंडुलकर’ याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अध्यक्षपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून, सध्या त्याच हे व्यक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. सचिन तेंडुलकरला ओळखत नसेल असा व्यक्ती शोधणे कठीण आहे. 24 वर्षे क्रिकेट खेळपट्टीवर राज्य करणाऱ्या सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत. ज्याच्या आसपासही कोणी नाही. आणि म्हणूनच सचिन तेंडुलकर याला ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखलं जात.
दरम्यान, याच मास्टर ब्लास्टरला नुकतंच एका कार्यक्रमात ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सचिनने जे काही उत्तर दिलं त्यानंतर एकच हश्या पिकला. या प्रश्नाचे उत्तर देताना सचिन म्हणाला की, “मी रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुलीसारखा वेगवान गोलंदाजी करत नाही. सौरव गांगुली एका दौऱ्यावर 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता आणि नंतर त्याला पाठीचा त्रास झाला’, असं म्हणत सचिन याने हा प्रश्न उपरोधिकपणे फेटाळून लावला.
‘सचिन तेंडुलकर’चा वानखेडे स्टेडियमवर उभारणार पुतळा…!
वयाच्या सोहळ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण करणाऱ्या ‘सचिन तेंडुलकर’चा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिली आहे. येत्या वन डे वर्ल्ड कपदरम्यान या पुतळ्याचं अनावरण पार पडेल. 14 नोव्हेंबर 2013 ला वानखेडे स्टेडियमवरच सचिन तेंडुलकरने आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती.
वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. आता याच स्टेडियमवर मास्टर ब्लास्टरचा भव्य पुतळा देखील उभारण्यात येणार आहे. सचिनच्या 50 व्या वाढदिवशी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असून, मुंबई क्रिकेट असोसिएशनन कडून सचिनसाठी ही कौतुकाची भेट असले. असं देखील अमोल काळे यांनी यावेळी सांगितलं.