मुंबई – टीम इंडियाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पाच गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करताना 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या सामन्यात खास चमक दाखवू शकला नाही मात्र तरीही मॅचनंतर विराटचीच चर्चा होती. याच कारण होत मॅचदरम्यान त्याने मैदानावर केलेला डान्स.
ऑस्करमध्ये RRR च्या यशानंतर नाटु नाटु गाण्याची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. क्रिकेट स्पर्धेत सहभागी असूनही स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या मनात नाटु-नाटु हे गाणे सुरु होत कि काय असच वाटत होते. यामुळेच कोहलीने या गाण्याची हुक स्टेप मैदानातच करायला सुरुवात केली.या बाबतचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांनी व्हायरल करायला सुरुवात केली आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान विराटने नाटु-नाटु गाण्यावर ठेका धरला. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विराटचा हा डान्स कॅमेऱ्यात कैद झाल्याने सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Virat naatu naatu step vesthunadu ga @tarak9999 @AlwaysRamCharan @imVkohli#NaatuNaatu pic.twitter.com/3sLOIYiUMT
— AK🐾 (@Arun_2_) March 17, 2023
चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनात अॅक्शन ब्लॉकबस्टर “RRR” ला “नाटु-नाटु” साठी सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीमध्ये अकादमी पुरस्कार मिळाला. हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारे नाटु नाटु हे पहिले भारतीय गाणे आहे.