मुंबई – सन 2018 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरस्टार यशचा ‘केजीएफ’ हा चित्रपट त्या वर्षामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला होता. चित्रपटातील त्याच्या रॉकी या भूमिकेमुळे यशचे सर्वत्र खूपच कौतुक झाले. तसेच त्याची स्टाईलही युवावर्गात ट्रेंड झाली होती. यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.
आणि अखेर 14 एप्रिल रोजी ‘केजीएफ 2’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. विशेष बाब म्हणजे, हा चित्रपट 4400 स्क्रीनवर एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला असून, या चित्रपटाने बॉलिवूडच्या सर्वच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहे. हिंदीत देखील या चित्रपटानं जोरदार कमाई केली आहे.
मात्र, याचं बरंचसं श्रेय डबिंग आर्टिस्ट्सनाही द्यावं जातं. कारण जर आवाज ताकदीचा नसेल आणि डबिंग व्यवस्थित झाली नाही तर त्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळत नाही. आजवर ‘बाहुबली 2’मध्ये प्रभासला अभिनेता शरद केळकरने तर ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनला अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला आहे. हे दोन्ही कलाविश्वातील लोकप्रिय चेहरे आहेत. तर, ‘केजीएफ 2’मध्ये यशला आवाज देणारा सचिन गोळे फारच क्वचित लोकांना माहित असेल.
View this post on Instagram
‘केजीएफ 2’मध्ये यशच्या भूमिकेला म्हणजेच, ‘रॉकी भाई’ला सचिन गोळे या डबिंग आर्टिस्टने आपला आवाज दिला आहे. सचिन गेल्या 14 वर्षांपासून डबिंग इंडस्ट्रीत काम करतोय. 2008 मध्ये त्याने करिअरची सुरुवात केली. “मुंबईत मी अभिनेता होण्यासाठी आलो होतो. माझ्या कुटुंबीयांनीही माझी खूप साथ दिली. मात्र मुंबईत आल्यानंतर माझा खरा संघर्ष सुरू झाला.
View this post on Instagram
मला काम मिळत नव्हतं, राहायला पैसे नव्हते. अशातच माझा मित्र अनिल म्हात्रे याने माझी ओळख डबिंग विश्वाशी करून दिली. त्यांच्यासोबत मिळून मी नाटकासाठी काम करायचो. हळूहळू मला डबिंग इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मी नंतर यातच काम करू लागलू’. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत सचिन गोळे याने आपला अनुभव सांगितला.