किव्ह – युक्रेन मधील स्नेक आयलंड मधून रशियाची माघारयुक्रेन मधील स्नेक आयलंड मधून रशियाची माघार युक्रेन वर अतिक्रमण केल्याच्या सुमारे साडे चार महिन्यांनतर रशियाने तेथील स्नेक आयलंड मधून माघार घेतली आहे. त्यामुळे हा भाग आता पुन्हा युक्रेनच्या ताब्यात आला आहे.
हे बेट जहाज वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. युक्रेनच्या मुख्य किनाऱ्यापासून सुमारे 25 सागरी मैल अंतरावर हे बेट असून त्यावर रशियाने ताबा मिळवला होता. त्या बेटावरील रशियन फौजांवर गेल्या महिन्यापासून युक्रेनच्या लष्कराने सातत्याने हल्ले चढवून त्यांना चांगलेच जेरीस आणले होते. त्यामुळे रशियाला तेथून माघार घ्यावी लागली होती.
रात्रीच्यावेळी युक्रेनच्या फौजांनी या बेटावरील रशियन ठिकाणांवर सातत्याने हल्ले केले. त्यामुळे काल दोन स्पीड बोटींच्या सहाय्याने त्या बेटावरील रशियन जवानांनी तेथून माघार घेतली. युक्रेनचे अध्यक्ष झलेन्स्कीय यांनी आपल्या लष्कराच्या या दैदिप्यमान कामगीरीचे कौतुक केले असून त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारीमुळेच आता त्या बेटावर एकही रशियन उरलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.