लंडन – युरोपमधील 1945 सर्वात मोठे युध्द लादण्याची रशिया तयारी करत असल्याचे पुरावे आपल्या समोर येत आहेत. त्याबाबत काही क्षेत्रात त्यांनी तयारी सुरी केली आहे, असे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटले आहे. बीबीसी या वृत्त वाहिनीशी बोलताना जॉन्सन म्हणाले, युक्रेनची राजधानी केवीयला घेरण्याची रशियाची योजना असल्याचा गुप्तचरांच्या अहवालावरून दिसत आहे. मानवी जीवनाचा किंमत ओळखायला शिकायला हवे.
15 हजारजवान तैनात
रशियाने युक्रेनच्या पुर्व सीमेवर सुमारे दीड लाख जवान तैनात केले आहेत. केयीवमध्ये असणाऱ्या नाटोच्या तळापासून देशाच्या संरक्षणासाठी ही सिध्दता केल्याचे रशिया सांगत आहे. पाश्चिामात्य देश रशिया हा युक्रेनवर आक्रमणाच्या तयारीत असल्याचा दावा करत आहेत.
आर्थिकनिर्बंधांचा इशारा
या पुर्वी इशारा दिला आहे त्या पेक्षा अधिक कडक आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा जॉन्सन यांनी दिला. ते म्हणाले, रशियन कंपन्यांवर अमेरिका आणि इंग्लंड पाऊंड आणि डॉलरमध्ये व्यवहार करण्यास निर्बंध करतील त्याचा परिणाम अधिक भयावह असेल.
दोन लाख सैन्याची जमवाजमव
अमेरिकन सरकारच्या ताज्या संदाजानुसार युक्रेनच्या सीमेवर सध्या एक लाख 69 हजार ते एक लाख 90 हजार सैन्य तैनात करण्यात आले आहे हे सैन्य रीशया आणि शेजारच्या बेलारसमध्ये तैनात करण्यात आले आहे. त्यात पूर्व युक्रेनमधील बंडखोरांचा समावेश आहे.
हल्ल्याच्या बातम्या खोट्या
युक्रेनच्या पुर्वेला असणाऱ्या रशियाच्या हद्दीत स्फोट घडवल्याच्या बातम्या काल प्रसृत झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य राष्ट्रांची वार्षिक सुरक्षा परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी संबोधित केले. ते म्हणाले. या सर्व बातम्या खोट्या आहेत अशा प्रक्षोभक गोष्टींना आम्ही बळी पडणार नाही. आमच्या बाजूने काही तरी त्या दिशेला उडत असल्याचे दाखवण्यात आले. ते सारे तद्दन खोटे आहे. त्यात सत्य एवढेच आहे की पलिकडील बाजूला (रशियात) काहीतरी शिजत आहे. पाश्चिामात्य देशांनी रशियावर निर्बंध लादण्यासाठी त्या देशाने युक्रेनवर आक्रमण करण्याची वाट पाहू नये. ते लादण्यास सुरवात करावी.
अमेरिकेचा इशारा
देशाच्या सीमा ताकदीच्या बळावर बदलता येणार नाहीत, असे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी रशियाला ठणकावले आहे. आम्ही आर्थिक निर्बंध लादण्याच्या तयारीत असून त्याचे परिणाम गंभीर होतील. आम्ही रशियाच्या आर्थिक संस्थांना लक्ष्य बनवू, असे त्या म्हणाल्या.
शांततेचे प्रयत्न
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना अनेक राष्ट्राध्यक्षांनी दूरध्वनी करून सध्या सुरू असणारा तणाव निवळावा यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची जबाबादारी रशिया स्वीकारणार नाही, अशी आशा जर्मनीचे परराष्ट्र मंत्री अनालेना बेअरबॉक यामनी व्यक्त केली आहे. आमचा त्यांना स्पष्ट संदेश आहे, की आत्मघाती चूक करू नये… त्यांनी आपल्या फौजा मागे घ्याव्यात…