मेष : या सप्ताहात ग्रहांची स्थिती साथ देणारी आहे. त्यामुळे धंदा व्यवसायात हाती घेतलेल्या कामांची योग्य आखणी करून ती मार्गी लावा. नवीन कामे मिळवण्यासाठी ओळखीचा फायदा होईल. आर्थिक आवक जावकही सुधारेल. त्यामुळे मनोबल चांगले राहील. नोकरीत कामाचा वेग दांडगा राहील. स्वत:ची कामे संपवून इतरांनाही कामात मदत कराल. नोकरीत वरिष्ठांची मर्जीत राहील. घरात कामात वेळ चांगला जाईल. अपेक्षित येणी येतील.
वृषभ : या सप्ताहात दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. अनपेक्षित फायदा मिळवून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाची कामे पार पडतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. घरात खर्च वाढला तरी चांगल्या कामासाठी असेल. आनंदाची बातमी मना प्रसन्न करेल. तरुणांचे विवाह जमतील. खेळाडू कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात मान मिळेल. धार्मिक कार्ये हातून घडतील. घरात गृहसौख्याचा आनंद मिळेल.
मिथुन : चित्त स्थिर नसल्याने तळ्यात मळ्यात राहाल. व्यवसायात योग्य व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्या. कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्या. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने करा. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवा. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. घरात नवीन वाहन वस्तू खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. पैशाचे व्यवहार जपून करा. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. घरात गृहसौख्याचा आनंद मिळेल.
कर्क : व्यवसाय व नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्वासाने केलेली कामे व कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. मनस्वास्थ्य मिळेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
सिंह : काहीतरी भव्यदिव्य करण्याची सुप्त इच्छा राहील. परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जा. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवा. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील. कामाचा ताण वाढला तरी रागावू नका. घरात महिलांनी हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, तसेच तडजोडीचे धोरण ठेवून इतर व्यक्तींशी वागावे. मानसिक तोल सांभाळावा.
कन्या : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्यक ठरेल. नोकरीत प्रलोभनांपासून स्वत:ला दूर ठेवणे फायद्याचे होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरात तुम्हाला मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. स्वत:ची कामे संपवून इतरांनाही कामात मदत कराल.
तुळ : “हाती घ्याल ते तडीस न्याल’ व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल. तुमचे आखलेले आखाडे अचूक येतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नवीन कामाची संधी मिळेल. घरात गृहसौख्याचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
वृश्चिक : तुम्ही व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा मिळेल. घरात महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. घरात मनाप्रमाणे कामे होतील. शुभवार्ता कळेल.
धनु : “प्रयत्न वाळूचे…’ या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्यप्राय कामे शक्य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नोकरीत कर्तव्यदक्षता वाढवून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. घरात तात्विक वादविवादांना सामोरे जावे लागेल. तरी डोके शांत ठेवा. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. तरुणांनी अतिसाहस टाळावे. इतरांना कामात मदत कराल.
मकर : अचानक सर्व काही सुरळीत झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील. हातून चांगली कामे गती घेतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ती कृती कराल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाधान मिळेल. घरात महिलांना परोपकाराची संधी मिळेल. धार्मिक कार्ये हातून घडतील. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळेल.
कुंभ : आळस झटकून मोठ्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसायात सुसंवाद साधून कामं करण्यावर जास्त भर राहील. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाची चिंता मिटेल. कामात प्रसंगावधान राखून कामे पूर्ण कराल. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. स्वत:ची कामे संपवून इतरांनाही कामात मदत कराल. महिलांचा मानसिक ताण कमी होईल. सुवार्ता कळेल. घरात महत्त्वाचे प्रश्न धसास लागतील. धार्मिक कार्ये हातून घडतील. सामूहिक कामात पुढाकार राहील.
मीन : सप्ताहात तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. नम्र व संयमाने वागून कामे पूर्ण कराल. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. तुमच्या कृतीतून त्यांना प्रेरणा मिळेल. घरात जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची ऊब मिळेल. खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठी होईल. मनस्वास्थ्य मिळेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.