सकाळचे बारा वाजून गेले होते. बुराण चाळीत आता कुठं दिवस उजाडायला लागला होता. हळूहळू. म्हातारी तारा चुलीजवळ बसून दातांवरून मिश्री फिरवत बसलीय. चुलीवरच्या हंड्यात पाणी तापतंय. तेवढ्यात कुठूनतरी विज्या दाढी खाजवत येतो.
‘ए मॉं, दो सो रुपए दे ना. बाजारमे नया कॅसेट प्लेयर आया है, वो खरिदना है.’
तशी तारा त्याच्या अंगावर व्हसकन ओरडते, ‘मेरे पास सो-सो के नोट होते तो मै क्या चोलीमे दबा के रखती क्या..?’ काळी पिंक टाकून ती पुन्हा म्हणते, ‘जा कोई नया बडा गिराईक ढूंडके ला… सुना है मलिक साब के पास कोई बंबैय्या साब आया है, उसको नया माल मंगता है… तू जा उनको पटा. मै इधर सीमा को बोलकर सना को तैयार करती हूँ’
विज्या चकित होऊन म्हणाला, ‘पर मॉं… सना तो अभी सिर्फ…’ तशी तारा ओरडते, ‘तू अभी मुँह मत कर… जा काम पे लग जा… पैसा चाहिए ना…’ विज्या निघून जातो. तारा सीमाला हाका मारून बोलावून घेते. ‘क्या रे बडी मॉं, इतना आवाज क्यू लगा रही हो… किसीको आग लगी है क्या…?’
तारा: हा, हा आग ही तो लगी है. गाव मे नया मेहेमान आया हुवा है. विज्या उसको पटाने गया है…
सीमा : तो?
तारा : तो क्या.. चल तू सना को तय्यार कर.. उसका आज मुजरा रखते है…
सीमा : नही बडी मॉं… मै सना को इस किचड मे उतरने नही दूंगी.. छोटी है वो अभी…
तारा : अरे क्या किचड विचड लगा रख्खा है, तैयार कर उसे… और छोटी काय की… बडी हो के पुरे तीन साल हो चुके… हमारे समय पे हमारी मॉं के सामने इतना नाटक करने की हिम्मत नही होती थी हमारी… चल चल मेरा मुँह क्या देख रही हो… चल तैय्यार कर उसे, और ज्यादा शाणी बननेका नाटक किया तो तुझे तेरेही कमरेमे बंद करके रखूंगी… और तेरी गोरी सना का मुह ऍसिडसे रंगा दूंगी फिर बैठना उसे गोद मे लेकर. फिर एक रुपये के भी लायक नही रहेंगी… चल निकल अब’
सीमा निघून जाते.
सना कसलंतरी पुस्तक वाचत लोळत पडलेली असते.
सीमा : बेटा सना चल जल्दी कर बडी मा ने तेरा मुजरा रख्खा है आज… चल नहा ले बेटा.
सना : पर मा मै ये काम नही करनेवाली, तुझे पता है ना? देख मै अभी क्या पढ रही थी… की सुभाष चंद्र बोस ने भारत मे पेहेली लडकीयोंकी आर्मी बनायी थी… मॉं मुझे भी आर्मीमे जाना है… मुझे नही करना ये नाच गाना, ये गंदी चिजे… मॉं मुझे घीन आती हे कोई मेरी तरफ ऊस नजरसे देखता है तो… मा, मुझे पढना है, मुझे मिलिटरी ज्वाइन…
तिचं वाक्य अर्धच राहिलं, तितक्यात तारा तिथे आली आणि तिला दंडाला धरून ओढत, बाथरूममध्ये जवळपास ढकलंलच.
तारा : बडी आई आर्मी मे जानेवाली… इतने दिन से पाला है तुझे वो क्या आर्मी मे भेजने के लिए? आर्मीमे जाना हे तो तेरे बाप से पैसा ले के आ… बस अब… चल तैयार हो जा और जादा नाटक नही चाहिये समझी ना…
सनाला आता आज काय होणार याची पूर्ण कल्पना आली होती. अगदी नाईलाजानं ती तयार होते.
संध्याकाळी एक एक करून पाहुणे येऊन बसायला लागतात.
शेवंतीच्या फुलासारख्या रंगाचा अनारकली ड्रेस घालून, केसांतही शेवंतीच्या फुलांच्या वेण्या माळून सना तयार होते… काळी काजळाची रेघ आपल्या पापण्यांखाली ओढते, केसांतून रिठ्याचा वास घमघमत असतानाच… तारा आत येते.
तारा : हो गयी तैय्यार बेटी? चल अब देर मत कर वो कब के आ बैठे है…
सीमा : बेटा, जम के गाना बेटा… मेरा भी नसीब आज तुम्हे दे देती हूँ…
असं म्हणून ती तिच्या हातातली एकुलती एक सोन्याची बांगडी काढून सनाच्या हातात घालते.
“मेरा बस चलता तो आज मै तुम्हे ये करने नही देती… लेकीन जब मै खूदकी जान बचाके भाग रही थी तब बडी मॉं ने ही मुझे आसारा दिया था. एक बात हमेशा याद रखना बेटी अभी इन्सानियत बाकी है… बाकी सब उपरवाले के हाथ!’
सना काहीही न बोलता बाहेर निघून जाते.
एका पुरुषाचा आवाज “क्या कमल खिला है आज…’
दुसऱ्या पुरुषाचा आवाज “ऐसे गाव मे इतना बेहेतरीन चेहेरा… अजीब है…’
वाद्यं वाजायला लागतात. सना दोन तीन ठुमऱ्या पेश करते आणि नंतर थोडा वेळ कथक सादर करते.
“क्या खूब, क्या बात, आज तो मजा आ गया’, असे आवाज प्रेक्षकांतून येत राहातात.
इकडे सीमा ताराकडे जाते.
सीमा : बडी मॉं, ये नाच गाना तो ठीक है…लेकीन आगे नही… बच्ची है वो अभी…
तारा : अब तु मत सिखा मुझे क्या ठीक है क्या नही… ले ये पान ले… तू भी तो पेहेले घबराई हुई थी… बाद मे सब ठीक हुवॉं ना…
सीमा : हा लेकीन, सना को पढना है… उसको बचा लो…
ती काय बोलत होती तिलाच कळलं नाही, नंतर ती गाढ झोपून गेली.
तारानं तिच्या पानात गुंगीची अफू घातली होती.
इकडे सनासाठी सौदा सुरू झाला. तशी तारा सीमाला त्याच खोलीत कोंडून बाहेर आली.
ते लोक आता सरसावले होते.
‘क्या बोलती है मौसी… कितनेमे देगी ये लडकी?’
‘अभी तो नयी है ना?’
तारा : हा हा बिलकूल… नयी ही है… पूरे बीस हजार लूंगी
‘बीस हजार तो ज्यादा है’
तारा : नही साब, बीस हजार से कम नही लूंगी. नही तो आप जा सकते हो… रेहेने दो हमारी लडकी हमारे पास.
‘ठिक है, पर मै लडकी को हमारे हवेलीपे लेके जाऊंगा. सुबेहे छोड दुंगा…’
तारा : जैसी आपकी मर्जी साहाब. पर जरा संभलके. लडकी है वो, अभी औरत नही बनी…
तो माणूस सनाला त्याच्या मोटारीतून घेऊन जातो. सना सीमाला शोधायचा निष्फळ प्रयत्न करते.पण तिला सीमा सपडत नाही.
(साहेबाच्या घरी)
सनाला घेऊन आलेला पुरुष : (प्रकाश) ‘आपके गाव की छोरीया वाकेही खूबसुरत है अंकल’
अंकल दिनेश : दिखाओ तो किसे लाये हो…
प्रकाश सनाला हाक मारतो.
सना येते. खाली मान घालून उभी रहाते.
अंकल दिनेश : उपर नही देखोगी तो हम कैसे देख पाएगे आपका चेहेरा? यहा देखो बेटी…
सना वरती पाहाते. तिच्या डोळ्यात पाणी असतं.
अंकल दिनेश : क्या हुवॉं बेटी? क्यु रो रही हो?
सना अजूनच स्फूंदून रडायला लागते.
सना : आज तक किसी आदमीने बेटी केहेके पुकारा नही. अंकल मुझे ये काम करना नही. मै आपके पैर छुती हू, आपके पैसे गये है, मुझे पता है…
अंकल दिनेश : (तिच्याकडे निरखून पाहात) क्या तूम सीमा की बच्ची तो नही?
सना : आपने कैसे पेहेचाना?
अंकल दिनेश : मुझे माफ कर दो बेटी, बहुत साल पेहेले मैनेही उसे तारा के पास छोडा था… लेकीन तब मुझे तारा ये काम करती है ये पता नही था… वैसे सीमा भी अच्छी इन्सान थी… लेकीन मै उसे घर मे नही रख सकता था इसलिए मुझे उसे तारा के पास छोडके आना पडा. बाद मे मै बंबई चला गया. इतने सालों के बाद कल ही आया हूँ…
सना आणि प्रकाश दिनेशकडे आवाक् होऊन पाहात असतात.
अंकल दिनेश : सना बेटी, अब तुझे बेटी बोला ही है तो मै एक पिता के नाते तेरा ब्याह कर देता हूँ… ये प्रकाश भी अकेला है… पढा लिख्खा है… और उसे तुम पसंद भी आयी हो, इसीलिए तो वो तुम्हे यहा लेके आया… कोई बात नही. आजही तुम दोनो मेरी गाडी ले के बंबई वापस चले जाना… सीमा को उस किचडसे बाहर निकाल के मै भी बंबई आता हू… आप दोनो की शादी मनाएंगे… अच्छे से जिंदगी बिताऐंगे…
सनाला तिच्या आईचे शब्द परत परत आठवत रहातात… अभी इन्सानियत जिंदा है… अभी इन्सानियत जिंदा है…
– अमृता देशपांडे