मेष : कामाचे व वेळेचे नियोजन करून घर व व्यवसाय नोकरीत आघाड्या सांभाळाव्या लागतील. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेलच. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्या. मनाप्रमाणे कामे होतील. समाधान मिळेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याकडे मात्र लक्ष ठेवा. वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या.
वृषभ : स्वतः जीवनाचा आस्वाद घेऊन त्यात सभोवतालच्या व्यक्तींनाही त्यात सामील करून घ्याल. मनोकामना सफल झाल्याचा आनंद मिळेल. व्यवसायात प्रमाण कामाचे वाढेल त्यामुळे मिळणाऱ्या फायद्याचेही प्रमाण वाढेल. हितचितकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कष्टाचे, कामाचे चीज होईल, आर्थिक वाढ होईल, नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी नजरेस पडेल.
मिथुन : भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. एखाद्या गोष्टीचा साकल्याने विचार करून मगच ती हाती घ्याल. व्यवसायात कामात सातत्यता ठेवणे गरजेचे आहे. देणी देऊन डोक्यावरचे ओझे कमी करा जादा काम करून जादा पैसे मिळवता येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या सल्ल्याला महत्त्व येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. सहकारी कामात मदत करतील.
कर्क : ग्रहांची मर्जी असल्याने तुमच्या सुप्त इच्छा आकांक्षा वाढतील. व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल व ते मित्रत्वाची भाषा बोलतील. आर्थिक स्थिती सुधारल्याने हायसे वाटेल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली संगत कामांना गती देईल. नोकरीत कामात बिनचूक राहून आजचे काम आजच पूर्ण करा. पैशाची तात्पुरती सोय होऊ शकेल. सहकारी कामात मदत करतील.
सिंह : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. एखाद्या कामातील यशाचे स्वरूप लक्षात येईल. व्यवसायात पुढाकार घेऊन एखादी धाडसी कल्पना साकार करावीशी वाटेल. त्यात प्रतिष्ठित व्यक्ती व हितचिंतकांची साथही मिळेल. पैशाची चिंता दूर होईल. नोकरीत कोणाचीही मदत घेण्यापूर्वी त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. कुवत ओळखून कामे स्वीकारा. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
कन्या : सध्या ग्रहमान अनुकूल असल्याने तुमचे इरादे बुलंद राहतील. कामांना गती मिळेल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचे तुमचे स्वप्ने प्रत्यक्षात साकार होईल. मोठ्या व्यक्तींचा सक्रिय सहभाग लाभेल. नोकरीत आवडीचे काम वरिष्ठ तुमचेवर सोपवतील. त्यामुळे पैशाची ऊब मिळेल. घरात सहजीवनाचा आनंद घ्याल. मुलांच्या प्रगतीचे स्वप्न साकार होईल. सुवार्ता कळेल.
तुळ : कामात चोखंदळ राहून कामे मिळवा. कामात सातत्यता टिकवून ठेवून नवीन कामाचे नियोजन करा. व्यवसायात जास्तीत जास्त चांगले काम करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न राहील. केलेल्या प्रयत्नांना लगेचच फायदा मिळेल, ही अपेक्षा नको. उधारीपेक्षा रोखीवर भर देऊन कामे मिळवा. नोकरीत हातातील कामे वेळेत संपवा. कामं नीट पडताळून बघून मगच वरिष्ठांपुढे घेऊन जा.
वृश्चिक : सप्ताहात तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा व कौशल्याचा योग्य वापर करून प्रगती साधा. व्यवसायात रेंगाळलेली कामे गती घेतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. सरकारी कामांत यश मिळेल. पैशाची तात्पुरती सोय होईल. देणी देता आल्याने समाधान राहील. नोकरीत कामांमुळे वरिष्ठांची मर्जी राखू शकाल. सहकारी कामात मदत करतील. नवीन काम करण्याची संधी मिळेल.
धनु : सप्ताहात तुमच्या अंगी असलेल्या गुणांचा व कौशल्याचा योग्य वापर करून प्रगती साधा. व्यवसायात रेंगाळलेली कामे गती घेतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. सरकारी कामांत यश मिळेल. पैशाची तात्पुरती सोय होईल. देणी देता आल्याने समाधान राहील. नोकरीत कामांमुळे वरिष्ठांची मर्जी राखू शकाल. सहकारी कामात मदत करतील. नवीन काम करण्याची संधी मिळेल.
मकर : ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल त्याचा लाभ घ्या. व्यवसायात ज्या कामात दिरंगाई झाली होती. ती कामे झपाट्याने पूर्ण होतील. व्यवहारात तुमच्या कामात अनुकूल घटना घडतील. पैशाची चणचण कमी होईल. नोकरीत अनपेक्षित चांगल्या घटनेमुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात सुवार्ता कळेल. मुलांच्या प्रगती व प्रवृत्तीबाबतची चिंता कमी होईल. महिलांना मनाप्रमाणे कामे पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल.
कुंभ : आळस झटकून कामाला लागाल. मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य लाभेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नोकरीत अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. कामातून तुमचे खास गुण नजरेस पडतील. वरिष्ठांनी सोपवलेल्या कामात युक्तीचा वापर करून पूर्ण कराल.
मीन : तुमच्या हौशी व आनंदी स्वभावाला पुरक ग्रहमान लाभत आहे. व्यवसायात साशंकता दूर झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन करारमदार होतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. पैशाची वसुली होईल. नोकरीत कामानिमित्ताने लांबचा प्रवास घडेल. चांगल्या दर्जाचे काम करून स्वत:मधील वैशिष्ट्य इतरांसमोर दाखवाल. घरात चांगली घटना योग्य दिशा दाखवेल. तुमच्या जीवनात आनंदाची बातमी कळेल.