मेलबर्न – जागतिक क्रिकेटमधील सर्वात सुंदर क्रिकेट मैदान अशी सार्थ ओळख असलेल्या एमसीजीवर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) आज (रविवार) सर्वात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. भारत व पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात येथे सुरु असलेल्या टी-20 विश्वकरंडक ( T20 WorldCup ) स्पर्धेतील सामना होत आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानकडून या स्पर्धेत झालेला पराभव भारतीय खेळाडू विसरलेले नाहीत, त्यामुळे पाकिस्तानवर मात करत विजयी पताका फडकावण्यासाठी रोहित सेना सज्ज बनली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मंहमद शमी, अर्शदीप सिंग व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, महंमद रिझवान, असीफ अली व शाहीन शाह आफ्रीदी यांच्यातील तुल्यबळ जुगलबंदी अवघ्या क्रिकेट जगताला पाहायला मिळेल. सर्वांगसुंदर मैदान, त्यात उपस्थित असलेले तब्बल एक लाख प्रेक्षक यांच्या साक्षिने भारतीय संघ या लढतीत विजय मिळवत आपला तिरंगा फडकावणार असाच विश्वास चाहत्यांमध्ये दिसत आहे.
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या या स्पर्धेत ( T20 WorldCup ) रविवारचा दिवस अन्य कोणत्याही घडामोडींपेक्षा या सामन्याच्याच चर्चेने नावाजला जाणार आहे. हायव्होल्टेज, महामुकाबला अशा विविध विशेषणांनी माध्यमांनी तसेच समालोचकांनी या सान्याचे वर्णन केले असून इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस कसोटी मालिकेपेक्षाही जास्त प्रेक्षकवर्ग भारत व पाकिस्तान सामन्याला लाभतो व आजही तेच चित्र दिसेल.
पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षी झालेल्या पराभवातून खूप काही शिकलो असून आता पाकिस्तानविरुद्ध एकही चुक होणार नाही याची काळजी घेऊ व चोख प्रत्युत्तर देऊ.
– रोहित शर्मा
सूर्यकुमार यादवनेच मला खेळपट्टीवर टीकून राहण्यास सांगितले व तो स्वतः धोका पत्करून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करेल. अशाच काही योजनांवर आम्ही सराव करत असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचा प्रत्ययही येइल.
– विराट कोहली
भारतीय फलंदाजीवर नियंत्रण राखणे सर्वात कठीण आव्हान असेल. रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या अशी तगडी फलंदाजी त्यांच्याकडे असून त्यांना रोखले तर विजय मिळवणे सुकर बनेल.
– बाबर आझम
पॉवरप्लेमध्येच जास्त वेगाने धावा करण्यात यश आले तर भारतासमोर मोठे आव्हान ठेवता येणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांच्या प्रमुख गोलंदाजांवरच दडपण राखण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
– महंमद रिझवान
…त्यासाठी व्ही मध्येच खेळा
पाकिस्तानच्या गोलंदाजीचा कणा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदीच आहे. त्यानेच गेल्या वर्षी आपल्या फलंदाजीची वाताहत केली होती. आता जर त्याचा सामना करायचा असेल व त्याच्या गोलंदाजीवरही वेगाने धावा करायच्या असतील तर सुरुवातीची काही षटके व्ही मध्येच खेळणे योग्य ठरेल. मिड ऑफ व मिड ऑनच्या दीशेने खेळत पॉवर प्लेचा जास्तीत जास्त लभ घेण्यात यश आले तरच पाकिस्तानवर दडपण येइल.
– सचिन तेंडुलकर
It wasn’t a match day but hundreds of Indian fans turned up to watch #TeamIndia nets today at the MCG. 🇮🇳🥁👏#T20WorldCup pic.twitter.com/z3ZiICSHL8
— BCCI (@BCCI) October 22, 2022