मुंबई – अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. मागील काही दिवसांपासून ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांनंतर तिने स्वत: पुढे येत इनस्टाग्राम पोस्टद्वारे ती लवकरच आई होणार असल्याचे सांगितले होते. तिच्या पोस्टनंतर तिच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता. यानंतर आता रुबिना दिलैकने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रुबिना दिलैकने केलेले फोटोशूट सध्या चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘ममाकाडो’ असे कॅप्शनमध्ये लिहीले आहे. या फोटोमध्ये रुबिना दिलैकने काळ्या रंगाचे शर्ट आणि पॅन्ट परिधान केले आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी ‘सुंदर मम्मी’ अशी कमेंट देखील केली आहे. सध्या ती तिचा गरोदरपणातील काळ एंजॉय करत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री रुबिना दिलीक छोटी बहू, शक्ती अशा गाजलेल्या मालिकांमधून लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस-14’ची विजेती रुबीना ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती चाहत्यांशी आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. छोट्या पडद्यावर आदर्श सून अशी प्रतिमा असलेल्या रुबिना आपल्या खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि मादक आहे. त्यामुळेच तिचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.