#IPL2019 : बंगळुरू विजयीलय कायम राखणार का?

-पंजाबसमोर मधल्याफळीतील अपयशाची चिंता
-दोन्ही संघांना गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार

बंगळुरू – आयपीएलच्या बाराव्या मोसमात पहिल्या सामन्यापासून पराभव पत्करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गत 2 सामन्यांमध्ये विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन केले असून आजच्या सामन्यात विजय मिळवून ते आपली विजयीलय कायम राखण्यास प्रयत्नशील असतील. तर, यंदाच्या मोसमात संमिश्र कामगिरीकरणाऱ्या पंजाबच्या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवने गरजेचे आहे.

यंदाच्या मोसमात बंगळुरूच्या संघाला पहिल्या सामन्यापासून पराभवाची चव चाखावी लागल्याने लागोपाठ सहा सामने गमावावे लागले होते. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पंजाबचा पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला होता.

मात्र, पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाल्याने त्यांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. यानंतर त्यांनी कोलकाता आणि चेन्नईया संघांचा पराभव करत स्पर्धेत पुनरागमन केले आहे. यावेळी बंगळुरूने यंदाच्य मोसमातील आपल्या 10 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे तर तीन सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवत सहा गुण मिळवले असले तरी सध्या तरी ते क्रमवारीत अखेरच्या स्थानी आहेत, या मोसमातील त्यांचे अजून चार सामने बाकी असून चार पैकी चारही सामने त्यांनी जिंकल्यास बंगळुरू प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
वेळ – रा. 8.00 वा
स्थळ – एम. चिन्नस्वामी मैदान, बंगळुरू

तर, दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आपल्या दहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला असून पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून सध्या ते क्रमवारीत पाचव्या स्थानी आहेत. पंजाबचे देखील चार सामने बाकी असून त्यांना या पैकी तीन सामने जिंकणे महत्वाचे असून हे तीन सामने जिंकल्यस त्यांची प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे आज चा सामना जिंकून आपली प्ले ऑफची आशा ते जागृत ठेवतील.

यावेळी बंगळुरूच्या संघाने यंदाच्या मोसमात फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरी त्यांच्या गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. याचा प्रत्यय कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात आला होता. त्या सामन्यात बंगळुरूने 211 धावांचे लक्ष्य देऊनही कोलकाताने ते पार केले होते.

कोलकाता विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूने 213 धावांचे बालाढ्य लक्ष्य ठेवूनही सामना केवळ 10 धावांनी आपल्या नावे केला होता. त्यामुळे त्यांना गोलंद्‌फाअजीत सुधारणाकरावयाची गरज असताना त्यांच्या ताफ्यात दाखल झालेल्या डेल स्टेनने आपल्यागोलंदाजीतून कामलीची कामगिरी नोंदवत कोलकाता आणि चेन्नई विरुद्धच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाता उचलला होता.

प्रतिस्पर्धी संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.