मेष : या सप्ताहात आवश्यक व्यक्तींशी संपर्क साधून महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मात्र, त्यात दिरंगाई करू नका. पैशाची चिंता नसेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत तुमच्या सरळसोट व धडाडीच्या स्वभावामुळे सहकाऱ्यांना फायदा होईल. नवीन ओळखी होतील. कामाचे समाधान मिळेल. घरात वातावरण आनंदी व उत्साही राहील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीने आनंद मिळेल. तरुणांना विवाह ठरवायला अनुकूल ग्रहमान आहे. महिलांनी मानले तर समाधान मिळेल.
वृषभ : संमिश्र ग्रहमान आहे. कामाच्या बाबतीत चोखंदळ राहाल. व्यवसायात नेहमीपेक्षा जास्तच स्वत:ला गुंतवून घ्याल. कोणतेही काम लगेचच होईल ही अपेक्षा ठेवू नका. थोडा धीर व सबुरी ठेवावी. पैशाची बाजू समाधानकारक राहील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. वरिष्ठांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. घरात किरकोळ कारणाने वादविवाद होतील. तरी डोके शांत ठेवावे. मोठी खरेदी होईल. तरुणांना नको त्या कामात वेळ जाईल. नोकरदार महिलांनी (बोलणे) मृदू ठेवावे.
मिथुन : सर्व आघाड्यांवर पुढाकार घ्याल. प्रकृतीमान सुधारेल. व्यवसायात काही नवीन प्रस्ताव येतील. त्याचा विचार कराल. सहकारी कामात मदत करतील. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत याची काळजी घ्या. जास्तीची कामे स्वत:हून ओढवून घेऊ नका. घरात दोन पिढीतील वैचारिक तफावत जाणवेल. मोठ्या व्यक्तींचा उपदेश तुम्हाला रुचणार नाही. व्यक्तिगत जीवनात नवीन मैत्री होईल. कलाकार खेळाडूंनी त्यांचे क्षेत्रात सजगवृत्ती ठेवावी.
कर्क : मनातील बेत प्रत्यक्षात साकार होण्यास उत्तम कालावधी आहे. व्यवसायात सहकाऱ्यांची मदत घेऊन कामे मार्गी लावाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत आवश्यक ते बदल कराल. नोकरीत केलेल्या कामावर वरिष्ठ फिदा होतील. काम थोडेच असेल पण दर्जा उत्तम असेल घरात प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. शुभकार्य ठरतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. नोकरदार महिलांना सहलीचा आनंद घेता येईल.
सिंह : प्रयत्न व नशीब यांची सांगड घालून कामे पुढे न्याल. व्यवसायात तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा राहील. अपेक्षित व्यक्तींकडून साथं मिळाल्याने तुमचे मनोधैर्य वाढेल. नवीन योजना व कामांना वेळ देण्यासाठी छोटा प्रवास घडेल. नोकरीत तडजोड केलीत तर काम होईल. सहकारी कामात मदत करतील. घरात शुभकार्य ठरेल व पार पडेल. मात्र एक प्रकारचा तणाव राहील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.
कन्या : सर्व आघाड्यांवर सतर्क राहाल. व्यवसायात पैशाची आवक चांगली असल्यामुळे गुंतवणुकीच्या नवीन पर्यायांचा विचार कराल. नवीन जागेचे नूतनीकरण करून गिऱ्हाईकांचे आकर्षण वाढवाल. जादा भांडवलाची गरज भासेल त्यासाठी हितचिंतकांची मदत घ्याल. नोकरीत कष्टाचे व जिकिरीचे काम वाट्याला येईल. परंतु केलेल्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. घरात तरुणांचे विवाह जमतील.
तुळ : या सप्ताहात अचूक अंदाज व योग्य वेळी केलेली कृती याचा फायदा होईल. व्यवसायात अवघड व कठीण कामात मार्ग सापडेल. कामानिमित्ताने परदेशगमन व परदेश व्यवहार होईल. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील व ते तुम्ही अक्कल हुशारीने पूर्ण कराल. घरात एखाद्या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हाल. मुलांच्या प्रगतीबाबत सुवार्ता कळेल. महिलांना हौसमौज करता येईल. प्रवासयोग संभवतो.
वृश्चिक : ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात उत्पन्नाचे प्रमाण चांगले असेल तर खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी देणी देता येतील. नवीन बेत योजना सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल. नोकरीत पूर्वी जे काम आळसाने लांबवले होते ते करावे लागेल. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे उरकावी लागतील. महिलांचा घरात सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न असेन. गृहसौख्य मिळेल. मुलांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
धनु : पैशाची ऊब मिळाल्याने तुम्ही खूश असाल. परंतु पैशाच्या हव्यासापोटी कुसंगत धरू नका. माणसांची पारख करून त्यातील खरे कोण व खोटे कोण याची परीक्षा करा. व्यवसायात विविध मार्गांनी पैशाचा ओघ सुरू राहील. जुनी येणी वसूल होतील. गुंतवणुकीचे नवीन पर्याय खुले होतील. कामांना वेग येईल. नोकरीत कामाच्या स्वरूपात फेरफार झाल्यास तुमचा फायदा होईल. नवीन ओळखी होतील. जोडधंद्यातून लाभ होईल. तरुणांनी वैवाहिक जीवनात पर्दापण करावे.
मकर : विनाकारण धावपळ, दगदग वाढेल. व्यवसायात सध्या सरळ कामात गोंधळ होईल. हातातोंडाशी आलेले कामं तांत्रिक कारणाने लांबवावे लागेल. प्रयत्न व चिकाटी ठेवलीत तर मात्र यश तुमचेच राहील. नोकरीत अधिकाराची व्याप्ती वाढेल. बेकार व्यक्तींना कामं मिळेल. देशात व परदेशात नोकरीसाठी प्रयत्न केल्यास चांगली संधी मिळेल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. खर्चामुळे बजेट कोलमडेल. तरीही आनंद वाटेल.
कुंभ : “शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात सभोवतालच्या परिस्थितीनुरूप ध्येयधोरणे ठरवाल. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कामात प्रगती कराल. प्रतिष्ठित व्यक्तींचे तंत्र सांभाळून काम करावे लागेल. वेळप्रसंगी शिलकीतले पैसे वापरावे लागतील. नोकरीत नवीन पद्धतीचे कामं हाताळाल. बुद्धीचातुर्याने कामात यशस्वी व्हाल. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांची एखाद्या समारंभानिमित्ताने गाठभेट होईल. तरुणांचे विवाह जमतील.
मीन :“अति तेथे माती’ हे लक्षात ठेवा. संयम ठेवून कृती करा. व्यवसायात अतिउत्साहाच्या भरात कामे ओढवून घेऊ नका. तुमच्या इच्छा आकांक्षा जरी मोठ्या असल्या तरी स्वत:ची कुवत ओळखून पुढे जा. नोकरीत एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करावे. कामात हयगय तुम्हाला व वरिष्ठांना खपणार नाही. घरात सर्वांचे समाधान करणे आहे हे लक्षात येईल. वृद्धांनी पथ्यपाणी सांभाळावे. कामात गुप्तता ठेवावी. महिलांना मनावर ताबा ठेवावा. कमी श्रमात जास्त यश मिळेल.