लंडन – मॅंचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने विलाररियलविरुद्धच्या लढतीत गोल केला. यानंतर आनंद साजरा करताना त्याने प्रेक्षकांच्या दिशेने आपल्या अंगावरील जर्सी काढून फेकली. मात्र, करोनाच्या नियमाचा भंग केल्यामुळे त्याला पंचांनी यलो कार्ड दाखवले.
रोनाल्डो यंदाच्या मोसमापासून पुन्हा एकदा त्याच्या मॅंचेस्टर युनायटेड या जुन्या क्लबकडे परतला आहे. चॅम्पियन्स फुटबॉल स्पर्धेतील या लढतीत त्याने थाटात गोलही केला. मात्र, त्यानंतर जल्लोषाच्या नादात त्याला आपण करोनाचे नियम भंग करत जर्सी फेकल्याचेही लक्षात आले नाही. मात्र, रेफ्रींनी त्याला हटकले व यलो कार्ड दाखवले, त्यामुळे विजयातही रोनाल्डोसह त्याच्या चाहत्यांचाही हिरमोड झाला.
या स्पर्धेच्या चार सामन्यांत मॅंचेस्टरला तीन पराभव पत्करावे लागल्यामुळे हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. विलाररियलविरुद्ध मॅंचेस्टरने 2-1 असा विजय मिळवला. मॅंचेस्टरकडून रोनाल्डोने अतिरिक्त वेळेत 95 व्या मिनिटाला केला.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये विलाररियलच्या पाको अल्कासरने 53 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर सातच मिनिटांत मॅंचेस्टरकडून एलेक्स टेलेसने गोल करत बरोबरी साधली.
त्यानंतर निर्धारित वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. सामन्याच्या 95 व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल केला व संघाचा विजय साकार केला. या विजयासह मॅंचेस्टरने एफ गटात तीन गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे, तर विलाररियचा संघ चौथ्या स्थानी आहे.