Entertainment । बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम इली खान याने 30 एप्रिलला फॅन्स डे साजरा केला. त्याने इन्स्टाग्रामवर पदार्पण केले. यानंतर काही क्षणातच त्याच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. त्याने यापूर्वी इंस्टाग्रामवर खाते तयार केले होते परंतु ते खाजगी ठेवले होते. आता सारा अली खानचा भाऊ इग्गीनेही सोशल मीडियाच्या जगात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. आणि त्याचे खाते हे अधिकृत खाते असल्याचे त्याने सांगितले आहे.
View this post on Instagram
इब्राहिम अली खानने इंस्टाग्रामवर पदार्पण केले आणि या हँडलवर त्याने एक पोस्ट केली. ज्यामध्ये 4 वेगवेगळे फोटो आहे. ज्याला 36 मिनिटांत 33,663 लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या. तर फॉलोअर्सबद्दल 564 हजार म्हणजे पाच लाख 64 हजार झाले. पण तो फक्त 41 लोकांना फॉलो करत आहे.
इब्राहिम अली खान इंस्टाग्रामवर सारा अली खान, करीना कपूर, सोहा अली खान, आलिया भट्ट, अमृता सिंग, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, रोहित शेट्टी, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, जेहान हांडा, के कौर, खुशी कपूर, रणवीर सिंग, अरहान खान, संदीप खोसला, टेबल टेनिस खेळाडू मुदित दानी, अलाविया, चेसला फॅन क्लब, अनन्या पांडे, करण जोहर, आर्यन खान, कुणाल खेमू, अली हाजी, शनाया कपूर, अलिझेह अग्निहोत्री, सुहाना खान, शिखर पहाडिया हे काही मित्र आहेत. यामध्ये पलक तिवारीच्या नावाचाही समावेश आहे. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. अनेकवेळा तो सारा आणि अमृतासोबत सुट्टीवरही दिसला आहे. जरी त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही.
हे वाचाल का ? Entertainment । शबाना आजमीने दिले आमिर खान ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ टाइटल