मुंबई – आयपीएल 2023 ( IPL 2023 ) सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, या मोठ्या टी-20 स्पर्धेसाठी जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे. अशात स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये क्रिकेटपटू आयपीएलबद्दल मजेदार किस्से सांगताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही ( Rohit Sharma first salary ) त्याच्या पहिल्या आयपीएलची आठवण झाली आणि त्यात मिळालेल्या पहिल्या सॅलरीबद्दल मजेदार किस्सा सांगितला.
आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला आणि त्यावेळी 20 वर्षीय रोहित शर्माला डेक्कन चार्जर्सने 7.5 लाख अमेरिकन डॉलर्समध्ये करारबद्ध केले. जे भारतीय रुपयात 4.8 कोटी इतके होते. डेक्कन चार्जर्सकडून रोहित शर्मानेही दमदार कामगिरी केली.
IPL 2023 : भुवीचा ‘तो’ विक्रम मोडण्यासाठी नारायण, अश्विनमध्ये चुरस
त्याने डेक्कन चार्जर्ससाठी तीन हंगामात 1170 धावा करत 2009 मध्ये विजेतेपद पटकावण्यात मोलोचे योगदान दिले. पण 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा आपल्या संघात समावेश केला होता. तेव्हापासून तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 5 वेळा विजेतेपद पटकावले.
7.5 लाख डॉलर्स म्हणजे किती हे माहित नव्हते – रोहित | Rohit Sharma first salary
रोहित शर्माने त्याच्या पहिल्या आयपीएलच्या मजेशीर गोष्टीबद्दल सांगितले की, पहिल्यांदा मला 7.5 लाख डॉलर्स किती आहेत हे देखील माहित नव्हते. लिलावासारखी घटना आमच्या बाबतीत कधी घडली नव्हती, आम्ही पाहिलीही नव्हती.त्यावेळी मी फक्त 20 वर्षांचा होतो.
आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. 2013 मध्ये त्याने पहिल्यांदा मुंबईचे कर्णधारपद भूषवले, त्यानंतर रोहितने इतिहास रचला. ( IPL 2023 )