Close competition between Bhuvaneshwar Kumar, Sunial Narayan & R Ashwin | इंडियन प्रीमियर लीगचा ( IPL 2023 ) 16वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामातही असे अनेक विक्रम होतील ज्यावर सर्वांच्या नजरा असतील. आयपीएलच्या गेल्या 15 हंगामात फलंदाजांच्या बरोबरीने गोलंदाजांनीही अनेकवेळा आपल्या दमदार कामगिरीचे दर्शन घडवले आहे.
यामध्ये सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. तर त्याच्या खालोखाल सुनील नारायण ( Sunil Narayan IPL 2023 ), आर अश्विन ( Ravichandran Ashwin IPL 2023 ) , हभजन सिंग आणि लसीथ मलिंगा यांच्यासारखे दिग्गज आहेत.
या लेखातून आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणार्या गोलंदाजांवर नजर टाकणार आहोत.
1. भुवनेश्वर कुमार | Bhuvneshwar Kumar IPL 2023
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या नावावर सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉलचा विक्रम आहे. भुवीने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 146 आयपीएल सामन्यांमध्ये 1406 डॉट बॉल टाकले आहेत.
भुवीला यंदाच्या हंगामातही सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण त्याच्या या विक्रमाला सुनील नारायण आणि आर अश्विन यांच्याकडून धोका आहे.
2. सुनील नारायण | Sunil Narayan IPL 2023
आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याच्या बाबतीत कोलकाता नाइट रायडर्सचा दिग्गज फिरकी गोलंदाज सुनील नारायन दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने 148 आयपीएल सामन्यांमध्ये 1391 डॉट बॉल टाकले आहेत.
त्याच्या खालोखाल असलेल्या राजस्थानच्या आर अश्विनसोबत जोरदार लढत पहायला मिळणार आहे.
3. रविचंद्रन अश्विन | Ravichandran Ashwin IPL 2023
चालाख गोलंदाज म्हणून ओळकल्या जाणार्या आर अश्विनने आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई, दिल्ली आणि पंजाबचेही प्रतिनिधित्व केले आहे. सध्या तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. अश्विनने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याच्या बाबतीत तिसर्या स्थानावर आहे.
अश्विनची कामगिरी यंदा समाधानकार झाल्यास तो या विक्रमाच्या यादीत अव्वल स्थानी पोहचू शकतो. अश्विनने आतापर्यंत 184 आयपीएल सामन्यांमध्ये 1387 डॉट बॉल टाकले आहेत.