विशाखापट्टणम : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने द. आफ्रिकेविरुद्ध पिहल्या डावात चहापानापर्यंत नाबाद २०२ धावांची मजल मारली.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या जोडीने सावध सुरुवात करत भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
रोहित शर्माने शतकी खेळीत वन डेप्रमाणे धुव्वादार फटकेबाजी केली. त्याने पाच उत्तुंग षटकार ठोकले. तसेच १२ वेळा चेंडू सीमापार धाडला. त्याला मयंकने जोराची साथ दिली.
मयंकने तुलनेने सावध खेळी केली. त्याने ११ चौकार आणि दोन षट्काराच्या साहाय्याने ८४ धावांवर खेळात होता. त्याचेही शतक पूर्ण होते का याची उत्सुकता आहे.