मुंबई- दिवे लावण्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करुन दिवे, मेणबत्ती लावा. कोरोनाच्या अंधाराला दूर करुन प्रकाश दाखवायचा आहे. एकजुटीने कोरोनाविरोधात उभे राहू, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे केलं. त्यावर अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान @narendramodi जी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 3, 2020
दरम्यान, दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं आहे.