Rohit Pawar : तरुणांचे, बेरोजगारीचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )यांची युवा संघर्ष यात्रा निघाली होती. पुण्याहून नागपूरपर्यंत ही यात्रा दाखल झाली असून, नागपुरात विधान भवनाजवळ धडकली आहे. रोहित पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते परिसरात आहेत. मात्र, आता त्यांची ही यात्रा नागपूर पोलिसांनी अडवली आहे.
पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. पण कार्यकर्त्यांकडून बॅरिकेट्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा झिरो माईल चौकावर पोहोचला आहे.
कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. तर पोलीसही सतर्क झाले आहेत. पोलिसांनी रोहित पवार यांना अडवलं आहे. त्यानंतर रोहित पवारांना पोलिसांनी उचलून पोलीस व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या या ठिकाणी प्रचंड कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.