Rajasthan New CM Bhajan Lal Sharma : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या नावांची घोषणा होताच राजस्थानमधील निवडणूक निकालापासून सुरू असलेली राजकीय सस्पेंस संपुष्टात आली आहे. सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे भजनलाल शर्मा यांच्या नावाची कुठेही चर्चा झाली नाही. अनेक मोठी नावे शर्यतीत गणली जात होती मात्र भाजपने भजनलाल शर्मा यांच्या नावाची राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी घोषणा केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. याआधी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने नवीन नावं देऊन सर्वांनाच चकित केलं. राजस्थानमध्येही असाच प्रकार घडला.
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा असतील. 56 वर्षीय भजनलाल शर्मा पहिल्यांदाच सांगानेरमधून निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी झालेल्या फोटो सेशनमध्ये ते चौथ्या रांगेत बसले होते. काही वेळाने भाजपने राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी त्यांच्या नावाची घोषणा केली.
भाजपा प्रदेश कार्यालय, जयपुर में पर्यवेक्षक व केंद्रीय रक्षा मंत्री श्री @rajnathsingh, भाजपा राष्ट्रीय महासचिव श्री @TawdeVinod, राज्यसभा सांसद सुश्री @SarojPandeyBJP, प्रदेश प्रभारी श्री @ArunSinghbjp, प्रदेश अध्यक्ष श्री @cpjoshiBJP, प्रदेश चुनाव प्रभारी श्री @JoshiPralhad एवं… pic.twitter.com/xl1pb2b31Y
— BJP Rajasthan (@BJP4Rajasthan) December 12, 2023
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांची एकमताने निवड झाली. भजनलाल शर्मा ब्राह्मण समाजातील आहे. ज्यांची राजस्थानमध्ये 7 टक्के लोकसंख्या आहे. मोठ्या कालखंडानंतर राजस्थानला ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला आहे
शर्मा हे संघाच्या जवळचे..
भजनलाल शर्मा हे सामान्य वर्गातील आहेत. ते पदव्युत्तर आहेत. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप या दोघांच्याही जवळचे मानले जातात. ते दीर्घकाळ संघाशी निगडीत असून त्यांचे संघाशी अतूट नाते आहे. पक्षावरही त्यांची चांगली पकड आहे. भजनलाल शर्मा राजस्थान भाजपचे चार वेळा महामंत्री राहिले असून ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांना अमित शहा तसेच जेपी नड्डा यांचे निकटवर्तीय मानले जाते.
भरतपूरचे रहिवासी…
56 वर्षीय भजन लाल शर्मा मूळचे भरतपूरचे निवासी आहेत. मात्र ते जयपूर येथील जवाहर सर्किलवर राहतात. त्यामुळे ते बाहेरचे असल्याचा आरोप केला जात होता. मात्र त्यांनी सांगानेर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. पक्षाने त्यांना प्रथमच जयपूर जिल्ह्यातील संगनेर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. जिथून ते जिंकून आमदार झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपने विद्यमान आमदार अशोक लौहाटी यांचे तिकीट रद्द करून 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भजनलाल शर्मा यांना तिकीट दिले होते.
Diya Kumari Biography : कोण आहेत दिया कुमारी? ज्या होणार Rajasthanच्या नव्या उपमुख्यमंत्री…
दहा वर्षापासून प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत
भजनलाल शर्मा हे दहा वर्षांपासून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. यापूर्वी ते मंडळाचे अध्यक्षही होते.
गेल्या निवडणुकीत पक्षाने दिले नव्हते तिकीट…
2003 मध्ये त्यांनी भरतपूरच्या नबाई मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना सहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2018 मध्ये शर्मा यांनी भाजपकडून तिकीट मागितले होते, परंतु पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.