जेरुसलेम, दि. 14- इस्रायल आणि पॅलस्टाईनमध्ये जोरदार रॉकेट वॉर सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर होत असलेल्या रॉकेट हल्ल्यात अनेक इमारती उद्धवस्त होत आहेत. रॉकेट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाझात 14 मुलांसह 65 लोकांचे मृत्यू झालेत.
दुसरीकडे इस्रायलमध्ये देखील 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली रॉकेट हल्ल्यात हमासचे अनेक कमांडर मारले गेले आणि गाझा पट्टीतील बहुमजली इमारत कोसळली. दक्षिण इस्त्रायलमधील बऱ्याच ठिकाणी रॉकेटचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे.
गाझा पट्टीतील हल्लेखोरांनी सांगितले की त्यांनी इस्रायलवर 130 रॉकेटचा मारा केला. इस्रायलकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकद्वारे गाझा शहरातील अल-शारूक टॉवर उद्वस्त केल्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी हे केले आहे.
या टॉवरमध्ये हमासद्वारे चालवण्यात येणाऱ्या अल-अक्सा टीव्हीचे मुख्यालय होते. बुधवारी इस्रायली हवाई हल्ल्यांनी गाझा शहरातील 14-मजली अल-शारुक टॉवर पूर्णपणे उध्वस्त केले आहे.