या संकटात आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे, करोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो; पंतप्रधानांनी नागरिकांना दिला धीर

नवी दिल्ली, दि. 14- देशभरात सुरू असलेल्या करोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. गेल्या 100 वर्षानंतर आलेली ही महामारी जगाची परीक्षा घेत आहे. या संकटात आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे. करोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो. भारत हिंमत हारणारा देश नाही. आपली एका अदृश्‍य शक्तीसोबत लढाई सुरू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा 8 वा हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी देशवासियांशी संपर्क साधला असता करोना संकटावर चिंता व्यक्त केली. कोविड रुग्णांचे दु:ख, वेदना मी समजू शकतो. आपली लढाई एका अदृश्‍य शक्तीसोबत आहे. या करोना व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे.

100 वर्षानंतर ही महामारी आली आहे. ही महामारी पावलोपावली जगाची परीक्षा घेत आहे. या काळात आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. गेल्या काही काळात देशावासियांनी जे भोगलं आहे. या संकटाच्या काळातही काही लोक स्वार्थासाठी औषधे आणि आवश्‍यक वस्तुंचा काळाबाजार करत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन मी राज्य सरकारांना करत आहे, असं त्यांनी सांगितले.

भारत हिंमत हरणारा देश नाही. कोणताही नागरिक हिंमत हरणार नाही. आपण लढू आणि जिंकू. देशभरातील रुग्णालयात मोफत लसीकरण केलं जात आहे. तुम्हीही लस टोचून घ्या. करोनाविरुद्धच्या लढाईत ही लस संरक्षण कवच म्हणून काम करेल. गंभीर आजारांपासून आपले संरक्षण करेल. मास्क आणि सुरक्षित अंतर हे विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.