रॉबर्ट वढेरांना पुढील पाच वर्षात जेलमध्ये टाकेल – मोदी 

नवी दिल्ली – ज्या लोकांना देशाच्या सुरक्षेची चिंता नव्हती. ते आज म्हणत आहेत देश असुक्षित हातामध्ये आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. हरियाणामध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी रॉबर्ट वढेरा यांच्यावरही निशाणा साधला.

नरेंद्र मोदी म्हणाले कि, रॉबर्ट वढेरा स्वतःला बादशाह समजत होते. परंतु, आता ते ईडीच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. सध्या त्यांना जेलच्या दरवाजपर्यंत आणले आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये जेलच्या आतमध्ये पाठवेन, असे त्यांनी म्हंटले आहे. काँग्रेस शेतकऱ्यांच्या गोष्टी करतो. परंतु, सत्य तर हे आहे कि, शेतकऱ्यांच्या जमिनीवर काँग्रेस भ्रष्टाचाराची शेती करत आहेत, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.