#IPL2019 : सामना रंगतदार होईल – श्रेयस अय्यर

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून आयपीएलमधील विदेशी खेळाडू बऱ्यापैकी आपापल्या संघांमध्ये दाखल होण्यासाठी परतले असून त्याचा तोटा सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघांना जाणवत असून आयपीएलच्या एलिमेनेटर सामन्याच्या पुर्वी बोलताना दिल्लीच्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने या बाबत आपले मत व्यक्त केले असून या खेळाडूंच्या अनुपस्थितीतही सामना रंगतदार होईल अशी अशा त्याने व्यक्त केली आहे.

यावेळी दिल्लीच्या संघाचा मुख्य गोलंदाज कगिसो रबाडा मायदेशी परतला असून सनरायजर्स हैदराबादच्या संघातील प्रमुख खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रोहे माघारी परतले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांची मदार दुसऱ्याफळीतील खेळाडूंवर अधीक असणार आहे असे मत अय्यरने व्यक्त केले आहे.

यावेळी दिल्लीच्या संघातून खेळणाऱ्या कगिसो रबाडाने यंदाच्या मोसमात 25 बळी मिळवले असून तो सध्या पर्पल कॅप मिळवण्याच्याअ स्पर्धेत अव्वल स्थानी विराजमान आहे. तर, डेव्हिड वॉर्नरने यंदा 692 धावा केल्या असून तोही ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर दिल्ली आणि हैदराबादचे संघ जास्त प्रमानात अवलंबून आहेत. त्यामुळे आजचा सामना अधीक रंगतदार होईल अशी आशा यावेळी अय्यरने व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.