मुंबई – बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता रणवीर सिंहला पाहण्यासाठी चाहत्यांची नेहमीच गर्दी होत असते. रणवीर आपल्या खास स्टाईलमुळे बर्याचदा चर्चेत असतो. यावेळी रणवीर सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.
गुरुवारी मुंबईतील रस्त्याने प्रवास करणाऱ्या रणवीरच्या आलिशान मर्सिडीज कारला एक बाईक चाटून गेली. त्यानंतर गाडीचं नुकसान पाहण्यासाठी रणवीरला कारबाहेर उतरावं लागलं. यानंतर त्याच्या अंगरक्षकाने रणवीरला पुन्हा गाडीत बसायला सांगितलं. मग तो गाडीत जाऊन बसला. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.
अभिनेता रणवीर सिंह लवकरच ’83’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीरने क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देव यांची भूमिका केली आहे.